ढाका (Bangladeshi Hindu) : बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय अखिल चंद्र मंडल या हिंदू युवकावर काही कट्टरपंथींनी इशनिंदचा आरोप करत हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लाम धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांवरून आरोप केले आहेत. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने हल्लेखोरांऐवजी पीडित युवकाला ताब्यात घेतले आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते आले की, जमाव हा अखिलला लाठ्या काठ्यांचा वापर करत मारहाण करत आहे. यामुळे अखिलला रक्तस्त्राव होताना दिसतो, मात्र, हल्लेखोर मारहाण करताना थांबत नाहीत.
एका अहवालानुसार, अखिल दागिन्यांच्या दुकानात उभा होता. त्यानंतर त्याने त्या ठिकाणाहून पळ काढत दुसऱ्या दुकानात गेला. यावेळी संबंधित जमावाने त्याचा पाठलाग करत त्याचे कपडे फाडण्यात आले. त्याला नग्नही करण्यात आल्याचे अहवालातून सांगण्यात येत आहे. याउलट अखिललाच अटक करण्यात आली आणि हल्लेखोरांवर गुन्हे न दाखल करताच त्यांना सोडण्यात आले.
इस्लामी कट्टरपंथी जमावाने हिंदू अखिलला मारहाण केली आणि त्यांनी टांगाइल सदर उपजिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. अशातच आता अखिलला गर्दीत सोडण्याबाबत मागणी केली जात आहे.