‘राज्य माहिती आयोगा’च्या मुख्य आयुक्तपदी राहुल पांडे

06 Apr 2025 16:04:31
 
Rahul Pandey appointed as Chief Commissioner of State Information Commission and Nagpur Tarun Bharat Editor-in-Chief Gajanan Nimdev appointed as Information Commissioner
 
मुंबई : ( Rahul Pandey appointed as Chief Commissioner of State Information Commission and Nagpur Tarun Bharat Editor-in-Chief Gajanan Nimdev appointed as Information Commissioner ) राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह विभागीय माहिती आयुक्तपदी दै. ‘नागपूर तरुण भारत’चे मुख्य संपादक गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची निवड करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवार, दि. 4 एप्रिल रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली. राहुल पांडे हे नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी पत्रकारितेत दीर्घकाळ योगदान दिले आहे. यापूर्वी ते नागपूर विभागाचे माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच, गजानन निमदेव हे दै. ‘नागपूर तरुण भारत’चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत, तर रवींद्र ठाकरे हे माजी आयएएस अधिकारी असून त्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
 
प्रकाश इंदलकर हेही माजी प्रशासकीय अधिकारी असून ग्रामीण आणि शहरी विकास क्षेत्रांतील त्यांचा अनुभव माहिती आयोगाच्या कार्याला नवी दिशा देईल. या चौघांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा असेल.
 
 
Powered By Sangraha 9.0