चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तामिळनाडूतील पांबन पूलाचे उद्घाटन केले आहे. ६ एप्रिल २०२५ रोजी राम नवमीचे औचित्य साधत त्यांनी पांबन पुलाचे उद्घाटन केले आहे. जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बांधण्यासाठी असो किंवा काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात येणारा जागतिक सर्वात उंच कमानी पूल असो. कन्याकुमारीचा पांबन पूलही त्याचेच एकमेव उदाहरण आहे. जूना पांबन पूल जवळजवळ आता बंद पडला आहे, म्हणून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल भारताच्या मुख्य रामेश्वरम बेटाला जोडण्यात आलेला आहे.
मात्र, यामुळे या पूलाला एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. हा पूल बांधण्यासाठी, रेल्वेला आधीच तंत्रज्ञान आणि अशांत समुद्राच्या आव्हानांचा समान कारावा लागत आहे.
हा पांबन पूल २.०८ किमी लांबीचा असून रेल विकास निगम लिमिटेडद्वारा बांधण्यात आला आहे. पुलाच्या उभ्या लिफ्टला वाहून नेणाऱ्या लिफ्ट स्पॅन चा आकार ७२.५ मीटल लांब, १६ मीटर रुंद आणि ५५० टन वजनाचा आहे. रामेश्वर किनाऱ्यापासून ४५० मीटर अंतरावर समुद्रातील हा भाग आहे.
आम्ही १० मार्च रोजी हा लिफ्ट स्पॅन हलवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर आतापर्यंत आम्ही ५५० टन वजनाचा लिफ्ट स्पॅन पुलाच्या मध्यभागी ८० मीटर हलवण्यात आला, असे आरव्हीएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. सर्वात मोठे आव्हान म्हणजे पुलाचे २.६५ अंश फिरणे, जर सरळ असते तर आम्ही ते इच्छित ठिकाणी लवकर पोहोचवू शकलो असतो.
दरम्यान, संबंधित कंपनीने पुलाच्या बांधकामाला ३० जून अशी अंतिम मुदत असल्याचे निश्चित केले होते. त्यानंतर ही अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.