भोपाळ (Shree Ram) : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये जॉय स्कूलचे संचालक अखिलेश मेबनना केरळातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या व्हॅट्सअॅप स्टेट्सवर "रक्तरंजीत हिंदू रामाची हरामी मुले", असे आक्षेपार्ह अपशब्द लिहिण्यात आले. यामुळे आता शहरात संतापाची लाट उसळली आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून आता हिंदू संघटनांना याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर पोलिसांना निवेदन सादर करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
संबंधित प्रकरणाच्या एका अहवालानुसार सांगण्यात आले की, हा प्रकरण धर्मांतरावरून रविवारी ३० मार्च २०२५ पासून सुरू झाला. धर्मांतराच्या आरोपाखाली एका ख्रिश्चन मिशनरीला हिंदू संघटनांशी संबंधित लोकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त होऊन अखिलेश मेबन यांनी वादग्रस्त विधान सोशल मीडियावर शेअर केले आणि वादाला तोंड फुटले आहे. यामुळे आता हिंदू कार्यकर्ते आणि संघटना रस्त्यावर उतरली आहे.
सोशळ मीडियावर प्रभू श्रीराम आणि हिंदू समुदायाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे मध्य प्रदेशातील जबरपूरमधील जॉय स्कूलटे संचालक अखिलेश बेन यांना केरळातून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊन हिंदूंना हरमी असल्याचे विधान केले आहे.
अशातच आता जबलपूर पोलिसांनी मेबान बांधवगडमध्ये लपल्याची माहिती आधी मिळाली होती. यानंतर तो नागपूरमार्गे पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत. अखेर मोबााईल फोनचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याला अटक करण्यात आली. जबलपूर पोलिसांनी आरोपीला केरळहून जबलपूरला आणण्यात आले आहे.
या प्रकरणावरून शहरात ताणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचा बोर्ड तोडला आणि काचेच्या खिडक्याही फोडण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले आहे. आरोपीने केलेल्या कृत्यामुळे धार्मिक भावना भडकवण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.