ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

05 Apr 2025 13:16:39

uday samant on ubt leaders
 
मुंबई : (Uday Samant) राज्यातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंचे अनेक अस्वस्थ नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेत कुणाचे इनकमिंग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
काय म्हणाले उदय सामंत?
 
"ठाकरे गटातील अनेक अस्वस्थ नेते आजही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. मी पाच माजी आमदारांचा आकडा सांगितला होता ते आलेत. तो आकडा पूर्ण झाला आहे. आणखी सहा जण पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर आहेत. त्यांचाही पुढील काही काळात पक्षप्रवेश प्रक्रिया होईल", असंही उदय सामंत यांनी म्हटले आहे.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत नवीन पक्षप्रवेशांची चर्चा वाढत आहे. अलिकडेच माजी आमदार राजन साळवी शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर उबाठाचे आणखी निष्ठावान पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यात आता उदय सामंत यांनी पुन्हा यावर गौप्यस्फोट केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0