सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रथमच हिंदू धर्मातील सर्व जातींचा एकत्रित वधू-वर मेळावा

05 Apr 2025 16:03:35
 
Vadhu Var Melava
 
मुंबई : अखिल भारतीय कोकण विकास महासंघाच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रथमच वधू-वर सूचक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक, १३ एप्रिल रोजी कुडाळ येथील स्व. बापूसाहेब महाराज सभागहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
हिंदू धर्मातील सर्व जातींचा एकत्रित असा हा वधु-वर मेळावा आहे. याप्रसंगी खासदार नारायण राणे, खासदार रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
हे वाचलंत का? -  भाजप एका विधानसभेत नेमणार ३ मंडल अध्यक्ष
 
या वधु-वर मेळाव्यासाठी ३०० रुपये इतके शुल्क असून वधु-वरा सोबत येणाऱ्या एका व्यक्तीला प्रवेश मोफत असेल. यावेळी सर्व विवाह इच्छुक वधु-वरांनी जन्मपत्रिका आणि पोस्टकार्ड साईड फोटो घेऊन येणे आवश्यक आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0