कुणाल कामराच्या अडचणीत वाढ? शो बंद ठेवण्यासाठी शिवसेना आमदाराचे 'बुक माय शो'ला पत्र

05 Apr 2025 21:52:06
 
 
Kunal Kamra
 
 
मुंबई (Kunal Kamra) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबनात्मक कविता रचली. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला जशास तसं उत्तर दिले. कुणाल कामरा हा उबाठा गटाच्या सांगण्यावरून हे सर्व करत असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता त्याला कायद्याची लढाई लढण्यास सामोरं जावं लागत आहे. अशातच आता संतप्त शिवसैनिकांनी पुन्हा कुणाल कामराला घेरले आहे.
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाचं तरी ऐकूण बोलत असल्याचा दावा शिवसैनिक करत आहेत. अशातच आता शिवसैनिकांनी त्याच्या शोवर बंदी आणण्यासाठी बुक माय शोला पत्राद्वारे अर्ज केला आहे. कुणाल कामराचे अनेक स्टँडअप कॉमेडीचे शो बुक माय शोवर हेतआ. मात्र, शिवसेनेचे आमदार राहुल कनालने बुक माय शोवर असणारे त्याचे सर्व शो हटवण्याची वनिंती केली आहे. एका प्रसारमाध्यानुसार, कुणाल कामराला काही प्रतिष्ठित कलाकारांच्या पंक्तितून वगळण्यात आले आहे. यामुळे कुणाल कामराने काहीही केले तरीही त्याच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. 
 
 
 
शिवसेना आमदार राहुल कनालने बुक माय शोला पत्र लिहिले होते. त्यानंतर बुक माय शोने पत्राचा मान ठेवत कुणाल कामराच्या कॉमेडी शोच्या तिकीट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान कनाल हे शिवसेनेचे महासचिव आहेत. यावेळी कनाल यांनी सांगितले की, त्याच्या कार्यक्रमासाठी तिकीट विक्रीची सुविधा सुरू ठेवणे म्हणजे त्याच्यासारख्या फुटीरतावादीचे समर्थन करणेच. ज्यामुळे शहरातील अनेकांच्या भावनांना आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम उपस्थित होऊ शकतो.
 
 
Powered By Sangraha 9.0