बंगळुरू (Vinay Somaiah suicide) : कर्नाटकातील बंगळुरूमधील नागवारामध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागे काँग्रेस आमदार पोन्नन्ना आणि स्थानिक काँग्रेस नेत्या थेनिरा महेना यांना मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्याची ओळख ही विनय सोमय्या असून त्याचे वय वर्षे हे ३५ आहे.
एका वृत्तानुसार सांगण्यात आले की, आमदार पोन्नन्ना यांची खिल्ली उडवल्याने विनय सोमय्या यांना दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पोन्नन्ना यांना दोषी ठरवत विनय सोमय्या यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले की, त्याच्या अटकेमुळे त्याच्या कुटुंबाला समाजात तोंड दाखवण्यास जागा नाही.त्यांच्या अटकेमुळे त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा आणखी खालवली आहे. जामीन मिळाल्यानंतरही पोलिसांनी त्याला अनेकदा त्रास दिला आणि त्यांला नाकी नऊ आणून ठेवले होते.
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात घेत त्याने काँग्रेस आमदाराविरुद्ध काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती देण्याचे काम केले,असे असताना सोमय्या यांच्यावर पोलिसांकडून छळ करण्यात आला. त्याला तो छळ सहन करावा लागला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
कर्नाटकचे मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस कारवाई आणि चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सत्य बाहेर येईल. परमेश्वर म्हणाला की, पोलीस या प्रकरणात चौकशी करतील आणि आवश्यक ती कारवाई करतील. तपासादरम्यान, सत्य बाहेर येईल आणि निष्कर्षांच्या आधारे कारवाईचे आदेश दिले जातील. दरम्यान, अशातच पोनन्नाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला की, मी त्याला किंवा थेनीर महीनाला ओळखत नव्हतो. मी त्याला धमकी दिली नाही किंवा कोणावरही एफआरआय दाखल करण्यास सांगितली नाही.