संसदेत वक्फ दरुस्ती विधेयक मंजूरीनंतर केरळात मोठी राजकीय उलथापालथ, ५० ख्रिस्ती नेत्यांचा भाजपात प्रवेश

05 Apr 2025 14:11:00

Waqf Amendment Bill passed
तिरुअनन्तपुरम : संसदेत नुकतेच वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर (Waqf Amendment Bill passed) झाले. त्यामुळे देशभरात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. केरळातील काही नेत्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात आणखी काही महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे वक्फदुरुस्ती विधेयक हे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.
केरळातील ४०० एकर जमिनीवर वक्फचा दावा आहे. आता हीच परिस्थिती लक्षात घेता काही ख्रिश्चिन समाजातील ५० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकूण ४०० एकर जमिनीवर दावा केल्याने, किनारपट्टीवरील वास्तव्यास असणारे ख्रिश्चन गेल्या १७४ दिवसांपासून निदर्शने करत आहेत.
 
 
 
मुनांबमला भेट दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी स्थानिक निदर्शकांना सांगितले की, राज्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या आंदोलामुळे पंतप्रधान आणि संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला आता मंजूरी देण्यात आली आहे. जोपर्यंत संबंधित जमिनीवरील अधिकार पुन्हा परत मिळत नाहीत. तोवर आम्ही आपल्यासोबतच राहणार आहोत. या विधेयकामध्ये जमिनीचे महसूल अधिकार परत करण्याची ताकद आहे. मुनांबमच्या लोकांनी निवडून दिलेल्या खासदार आणि आमदारांनी विश्वासघात केल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजपात सामील झालेले ५० लोक, सर्व ख्रिश्चन, पूर्वी काँग्रेस आणि सीपीआयचे मतदार होते, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक जोसेफ बेनी यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे केरळातील फक्त भाजपच त्यांच्या बाजूने उभा राहील असा मुद्दा भाजप मांडत आहे, जिथे सीपीआय आणि काँग्रेस दोघेही मुस्लिमांच्या हितासाठी लढण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात. एलडीएफ आणि यूडूएर मुनांबच्या लोकांसोबतच असल्याचा दावा करत आहे. असे असले तरीही आघाडी असणाऱ्या खासदारांनी विधेयकातील सुधारणांच्या विरोधात मतदान केले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात सीपीआय आणि काँग्रेसने स्थानिक लोकांच्या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0