नाशिक : ( Vijay Chaudhary in Nashik today ) भाजप संघटन पर्व ‘सदस्य नोंदणी अभियाना’च्या अनुषंगाने प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी हे उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव व नंदुरबारमध्ये भाजप पदाधिकार्यांची संघटनात्मक बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
विजय चौधरी यांच्यासमवेत उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे हेदेखील मार्गदर्शन करणार आहे. दि. ४ एप्रिल रोजी नाशिक येथे सकाळी १० वाजता संघटनात्मक बैठक होणार आहे. तर दि. ५ एप्रिल रोजी जळगाव येथे सकाळी १० वाजता संघटनात्मक बैठक तर त्याचदिवशी सायंकाळी ४ वाजता धुळे येथे धुळे व मालेगाव जिल्हा पदाधिकारी बैठक तसेच दि. ६ एप्रिल रोजी भाजप स्थापना दिनानिमित्ताने नंदुरबार येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कन्यादान मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता होईल.
वरील सर्व बैठकीस जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा निवडणूक प्रभारी, प्रवासी कार्यकर्ते, मंडल निवडणूक अधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष यांनी बैठकीस उपस्थित राहावे, अशी विनंती भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली आहे.