पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसाहाय्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली
30-Apr-2025
Total Views | 8
मुंबई:( maharashtra goverment Financial assistance Rs 50 lakhs to the families of those killed in the Pahalgam terror attack ) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच “मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देणार,” असा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला होता.