लोकसभेनंतर आता वक्फ सुधारणा विधेयकाची राज्यसभेत कसोटी, मंजुरीसाठी किती मतांची गरज लागणार?

03 Apr 2025 11:42:26
 
waqf amendment Bill will be tabled in rajya sabha
 
 
 
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill in Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. या सुधारित विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर झाले. आज म्हणजे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी हे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.
 
वक्फ सुधारणा विधेयकाची राज्यसभेत कसोटी लागणार, मंजुरीसाठी ११९ मतांची गरज
 
लोकसभेच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक राज्यसभेत मंजूर होणार का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही यावर चर्चा केली जाईल आणि नंतर मतदान पार पडेल. दुपारी १ वाजल्यापासून चर्चेसाठी कालावधी दिला जाणार आहे. विधेयक मंजुरीसाठी ११९ मतांची गरज आहे.
 
लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला २७२ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. भाजपकडे २४० सदस्य आहेत, मात्र भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने हे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. आता राज्यसभेत या विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने या विधेयकाचे रुपांतर कायद्यात होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0