"सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर करावी"; सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश

03 Apr 2025 12:35:14
 
 
sc judges now need to declare assets to cji before assuming office
 
 
नवी दिल्ली : (Supreme Court judges now need to declare assets) सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे निर्देश सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिले आहेत. संपत्तीचे तपशिल न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून जळालेल्या अवस्थेत रोकड सापडली होती. त्या प्रकरणाची चौकशीही सुरु आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
 
न्यायव्यवस्थेवर पारदर्शकता आणि जनतेची विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी पदभार स्वीकारताना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दि. १ एप्रिल रोजी झालेल्या न्यायालयाच्या बैठकीत सर्व ३४ न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत त्यांच्या संपत्तीचा खुलासा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर मालमत्तांशी संबंधित तपशील अपलोड केले जातील, असेही न्यायाधीशांनी सांगितले. तथापि, संकेतस्थळावर मालमत्तेची घोषणा ऐच्छिक असेल. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निश्चित संख्या ३४ आहे. सध्या ३३ न्यायाधीश आहेत, एक पद रिक्त आहे. त्यापैकी ३० न्यायाधीशांनी त्यांच्या संपत्तीचे जाहीरनामे न्यायालयात दिले आहेत. तथापि, हे सार्वजनिक केले गेले नाहीत.
 
 
Powered By Sangraha 9.0