अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा : मंत्री बावनकुळे

03 Apr 2025 16:29:34

minister Bawankule on action against those involved in illegal mining and transportation
 
मुंबई : ( minister Bawankule on action against those involved in illegal mining and transportation ) गौण खनिजांच्या अवैध उपसा आणि वाहतुकीवर आता कठोर कारवाई होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश बैठकीत दिले.
 
गौण खनिजांच्या अवैध उपसा आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. प्रवीण दरेकर उपस्थित होते. ज्या-ज्या ठिकाणी सक्शनपंप लावून अवैध वाळू उत्खनन सुरू आहे त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आ. दरेकर यांनी केली.
 
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील वाळू माफियांवर वचक बसणार आहे. आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 
महसूल विभागाने नवीन वाळू धोरण तयार केले असून, त्याद्वारे वाळू तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
 
 
Powered By Sangraha 9.0