हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला
03-Apr-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या (Waqf Board) सावळा गोंधळावरून टीका केली आहे. प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वक्फवर करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत. मात्र, वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रयागराजमध्ये निषादराज गुहा जयंतीनिमित्त योगी आदित्यनाथ बोलत होते.
त्यानंतर पुढे ते म्हणाले की, काही लोकांना प्रयागराजसारख्या पौराणिक ठिकाणाची ओळख मिळवायची नव्हती कारण त्यांची मतपेढी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण होती. वक्फच्या नावाखाली त्यांनी प्रयागराज आणि इतर शहरांमधील जमिनी बळकावल्याचा प्रकार घडला आहे. जेव्हा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा वक्फ बोर्डाने मानमानी करणारी विधानं करत प्रयागराजमधील महाकुंभाची जमीन ही वक्फची जमीन आहे. ती वक्फ बोर्ड आहे की लँड माफिया बोर्ड आहे? असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्डावर नियंत्रण ठेवल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले आणि राज्यसभेतही वक्फचे विधेयक मंजूर होईल असे त्यांनी सांगितले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात हे वक्फ सुधारणा विधेयक पार पडले आहे. दरम्यान किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयकावर विचार करण्यासाठी प्रस्ताव मांडला.
लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ राज्यसभेत मांडण्यात आले. कनिष्ठ सभागृहामध्ये १२ तासांची चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता २८८ जणांना वक्फ सुधारणा विधेयकाला हिरवा कंदील दर्शवला आहे. तर दुसऱ्या बाजूला २३२ जणांना याला विरोध केलेलो होता.