कबुतरांना दाणे घालताय? पाचशे रुपयांचा दंड भरण्याची तयारी ठेवा!

03 Apr 2025 15:35:28
 
feed pigeons you will be fined Rs 500 BMC Mumbai
 
मुंबई: ( feed pigeons you will be fined Rs 500 BMC Mumbai ) मुंबईत दादर, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून जुने कबुतरखाने आहेत. या बरोबर मु्ंबईच्या उपनगर परीसरातदेखील कबुतरांना खाणे देण्यात येते. यामुळे मुंबईतील रहीवाशी परीसरात मोठ्या प्रमाणात कबूतरे आढळून येतात. कबूतरांनमुळे होणार्‍या ञासांवर आता उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
 
कबुतराला खाणे देण्याविरोधात पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या जातात. परंतु मुंबई महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, असा संताप वारंवार मुंबईकरांकडून व्यक्त केला जातो. परंतु आता पालिकेने कबुतरांना खाणे देणाऱ्यावंर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
कबुतरांच्या विष्ठेमुळे अस्वच्छता, रोगराई पसरते, अनेक आजार पाहायला मिळतात. यात अस्थमा , श्वसनाचे त्रास आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो, अस्थमा आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. शिवाय कबुतरांच्या खाद्याची घाण, पिसे आणि दुर्गंधीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषणातही वाढ होते. याची उपाययोजना म्हणून पालिका आता बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
 
कबुतरामुंळे या आजारांचा गंभीर धोका
 
कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वासनलिकेला सूज , फुफ्फुसांना सूज येणं, राइनायटिस, त्वचेची अ‍ॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
Powered By Sangraha 9.0