देहारादून : उत्तराखंड राज्यातील हरिद्वार महापालिकेने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. महापालिकेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले मटण शॉप, चिकन शॉप सारखी दुकाने महापालिकेच्या हद्दीबाहेर स्थलांतरीत करण्यात आली आहेत. हरिद्वार महापालिका क्षेत्रात, प्रामुख्याने ज्वालापूर आणि जगजीतपूरमध्ये सुमारे १०० मटण शॉप सुरू आहेत. याचा मोजक्याच लोकांकडे वैध परवाना आहे.
हरिद्वार शहराचा उर्वरित भाग हा ड्राय झोन म्हणून नियुक्त करण्यात आला आहे, जिथे मांसाहारी पदार्थ आणि अल्कोहोलची विक्री प्रतिबंधित आहे. या निर्णयामुळे,संपूर्ण शहरात चिकन, मटण शॉप राहणार नाहीत. मात्र, काही भागात मांसाहारी पदार्थ असतीलही, हरिद्वार महापालिकेचे आयुक्त नंदन कुमार यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, आम्ही सराई गावात मांस विक्री करणाऱ्या दुकांनांचे बांधकाम पूर्ण केले आहे. आतापर्यंत एकूण ६० दुकानांचे बांधकाम करण्यात आले आणि दुकानं स्थलांतरित करण्यात आली. उर्वरित दुकानांना टाळे लावण्यात आले आहेत.
सर्व मांस विक्रेत्यांना स्थलांतराबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या स्थलांतरामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास नियंत्रित करण्यास मदत होईल. स्थानिक रहिवाशांना बऱ्याच काळापासून ज्वालापूर मांस बाजाराचे स्थलांतर करण्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांवर वचक ठेवणे यामुळे आणखी सोईचे होईल. स्थानिक रहिवाशांना बऱ्याच काळापासून ज्वालामूखी मांस बाजाराचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे, त्यांनी अस्वच्छता आणि अयोग्य कचरा विल्हेवाट लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. परवान्याशिवाय चालणाऱ्या निवासी भागात मांस विक्रेत्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.