मुंबई : रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदीर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ तास भाविक साईबाबांचे दर्शन घेऊ शकतात.
हे वाचलंत का? - वैचारिक गुलामगिरी कुठपर्यंत जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण...; केशव उपाध्येंचा हल्लाबोल
येत्या ६ एप्रिल रोजी रामनवमी आहे. या पार्श्वभूमीवर ५ ते ७ एप्रिल दरम्यान, शिर्डी येथे रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शिर्डीतील साई मंदिरात जय्यत तयारी सुरु असून लाखों भाविक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. रामनवमीनिमित्त मंदिराला फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. रामनवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदीर रात्रभर खुले राहणार असून भाविक २४ तास साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकतात.