रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता

    03-Apr-2025
Total Views |

Poonam Gupta
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी २ एप्रिल २०२५ रोजी पूनम गुप्ता (Poonam Gupta) यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. त्या सध्या आर्थिक धोरण थिंक टँक नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक आहेत. गुप्ता यांची नियुक्ती आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती अंतर्गत आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आणि वित्तीय बाजार कामकाजासाठी करण्यात आली.
 
जानेवारी २०२० ते जानेवारी २०२५ पर्यंत आरबीआयचे सध्याचे डेप्युटी गव्हर्नर मायरल डी. पात्रा कार्यरत आहेत. त्यांच्याजागी पुनम गुप्ता डेप्युटी गव्हर्नरपदी आपला कारभार स्वीकारणार आहेत. पात्रा यांनी मध्यवर्ती बँकेत चलनविषयक धोरण, आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन तसेच वित्तीय बाजार कामकाज पाहिले होते.
 
 
 
गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या आहेत आणि १६ व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या निमंत्रक आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेत जवळजवळ दोन दशके वरिष्ठ पदांवर काम केल्यानंतर त्या २०२१ मध्ये NCAER मध्ये सामील झाल्या.
 
अशातच त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड येथे त्यांनी अध्यापन केले. त्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिस्ट्यूट दिल्ली येथे त्या व्हिजिटिंग फॅकल्टी पदावर कार्यरत होत्या. गुप्ता नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी एनसीएईआरमध्ये आर्थिक वाढ, आंतरराष्ट्रीय वित्तीय संरचना, केंद्रीय बँकिंग, ,समष्टि आर्थिक स्थिरता, सार्वजनिक कर्ज आणि राज्य वित्त या विषयांवर काम करतात.