मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mehbooba Mufti Appeals Hindus) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पास झाले, मात्र तत्पूर्वी विरोधी पक्षांकडून वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्त्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा यास धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी तर देशातील हिंदूंना आवाहन केल्याचे निदर्शनास येत आहे. एकेकाळी काश्मीर मध्ये झालेला हिंदूंचा नरसंहार नाकारणारे हिंदूंसमोरच झोळी पसरवू लागलेत, हे यावरून दिसतेय.
माध्यमांना संबोधत मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, हे विधेयक अल्पसंख्याकांना कमकुवत करण्यासाठी बनवण्यात आले आहे. मला भाजपकडून कोणतीही अपेक्षा नाही, कारण गेली 10-11 वर्षे आपण पहात आहोत की कसे मुस्लिम मारले जात आहेत आणि मशिदी पाडल्या जात आहेत. पण हिंदू बांधवांनी याविरोधात पुढे यायला हवे, कारण हा महात्मा गांधींचा देश आहे, तो संविधानानुसारच चालला पाहिजे."