मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Varanasi Hindu Tattoo News) काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला आणि नंतर त्यांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता संपूर्ण देशात दिसून येत आहे. या घटनेनंतर देशभरात रस्त्यावर निदर्शने झाली. अशातच वाराणसी येथे काही जण हातावर टॅटू काढत आपली हिंदू ओळख सिद्ध करताना दिसतायत. यात पुरुषांसह महिलांचाही सहभाग असल्याचे दिसते आहे.
हे वाचलंत का? : अमेरिकेत पाकिस्तान दूतावासाबाहेर हिंदूंची तीव्र निदर्शने
वाराणसीतील या टॅटूच्या दुकानावर सकाळपासून मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली असून प्रत्येक वर्गातील लोक हातावर ‘हिंदू’ हे नाव गोंदवत आहेत. विशेष म्हणजे दुकानदार ‘हिंदू’ टॅटू गोंदवण्यासाठी येणाऱ्या सनातनींना ५० टक्के सवलतही देत आहे. 'पहलगाममध्ये ज्या प्रकारे हिंदूंना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले ते अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही आमचा धर्म लपवणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर परंतु गर्वाने सांगू आम्ही हिंदू आहोत, असा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे.