श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वजस्तंभ विधिवत स्थापित
29-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली, वैशाख शुक्ल द्वितीया अर्थात मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वजस्तंभ विधिवत स्थापित करण्यात आला. ध्वजस्तंभ बेचाळीस फूट लांब आहे. तो स्थापन करण्याची प्रक्रिया सकाळी ६:३० वाजता सुरू झाली आणि सकाळी ८ वाजता पूर्ण झाली. शिखराच्या कलशासह मंदिराची उंची १६१ फूट असून आता त्यात ४२ फूट उंचीचा ध्वजस्तंभही जोडण्यात आला आहे.