भारताच्या पाचव्या सागरी मासेमारी जनगणनेसाठी VyAS-NAV डिजिटल ॲपचे उद्घाटन
28-Apr-2025
Total Views |
भारताच्या पाचव्या सागरी मासेमारी जनगणना (MFC २०२५) च्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून VyAS-NAV या मोबाइल ॲप्लिकेशनची सुरुवात करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमाद्वारे डेटा संकलन करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या ॲपद्वारे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार असे सांगण्यात येते.
पारंपरिक पद्धतीतून भौगोलिक संदर्भित ॲप-आधारित डिजिटल प्रणालीकडे होणारा हा मोठा बदल आहे. मासेमारी जनगणना २०२५ अंतर्गत देशभरातील १२ लाख मासेमारी करणाऱ्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार असून पारदर्शकता व वास्तविक समयातील सत्यापन सुनिश्चित केले जाणार आहे.
ही मोठी जबाबदारी मत्स्यव्यवसाय विभाग (DoF), मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत समन्वित केली जात आहे.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह यांनी मुंबईत झालेल्या राज्य मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या बैठक दरम्यान VyAS-NAV या ॲपचे उद्घाटन केले. या बैठकीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध योजनांची अंमलबजावणी व प्रगतीचा आढावा घेण्यात आला. आईसीएआर - केंद्रीय समुद्री मत्स्य अनुसंधान संस्थान (CMFRI) ICAR-Central Marine Fisheries Research Institute (CMFRI), नऊ किनारी राज्यांमध्ये सागरी मासेमारी जनगणना राबविण्याचा प्रमुख संस्थान आहे, त्यांनी VyAS-NAV (Village jettY Appraisal NAVigator) मासेमारी जनगणना २०२५ अंतर्गत प्रत्येक मासेमारी करणाऱ्या कुटुंबाचा, गावाचा, नौकांचा, मासेमारी उपकरणांचा तसेच बंदर व मासेमारी केंद्रांच्या संबंधित पायाभूत सुविधांचा अचूक आणि सविस्तर दस्तऐवजीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
केंद्रीय समुद्री मत्स्य अनुसंधान संस्थान ने विशेषतः मोबाईल आणि टॅबलेटवर आधारित ॲप्स विकसित केले असून त्याद्वारे डेटा संकलन सोपे केले जाईल, त्याचबरोबर मानवी चुका कमी करून धोरणात्मक उपयोगासाठी डेटा संकलन करता येईल.
VyAS-NAV ॲप पर्यवेक्षकांद्वारे मासेमारी गावे, मासेमारी केंद्रे, व मत्स्य बंदरांची माहिती पडताळणीसाठी वापरण्यात येईल. यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम स्रोतांद्वारे गावांचा संक्षिप्त अहवाल तयार करण्याची क्षमता आहे.
पर्यवेक्षक हे CMFRI, Fishery Survey of India आणि किनारी राज्यांतील मत्स्यव्यवसाय विभागांचे कर्मचारी असतील. मुख्य सर्वेक्षण नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडेल. स्थानिक समुदायातील प्रशिक्षित गणनाकार (enumerators) प्रत्यक्ष सागरी मासेमारी कुटुंबांना भेट देऊन स्मार्ट उपकरणांद्वारे डेटा संकलन करतील.
याआधी तयारीचा विस्तृत टप्पा पूर्ण केला जाईल. मच्छिमारांच्या लोकसंख्यात्मक आणि सामाजिक-आर्थिक स्थिती, पर्यायी उपजीविका आणि सरकारी योजनांचा प्रभाव या सर्व गोष्टी ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नोंदविल्या जातील.
अधिकारी गणनाकारांना डिजिटल डेटा संकलनाच्या प्रशिक्षणासह VyAS-NAV ॲपद्वारे गाव व पायाभूत सुविधांची पडताळणी करतील.
भारताची सागरी मासेमारी. जनगणना क्षेत्र १० लाखांहून अधिक कुटुंबांसाठी उपजीविकेचे महत्त्वाचे साधन ठरले असून भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने निर्णायक भूमिका निभावत आहे.