पाकिस्तानप्रेमींसाठी भारतात एक इंचही जागा नाही!

- नितेश राणे; दहशतवादी आणि काँग्रेसचा ‘डीएनए’ एकच

    28-Apr-2025
Total Views |
पाकिस्तानप्रेमींसाठी भारतात एक इंचही जागा नाही!

मुंबई, ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदू नावे वापरून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात रहाण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र आणि देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही, अशी चेतावणी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.

काही मुसलमानांना नाहक मारहाण केल्याच्या घटनांवरून समाजवादी पक्षाद्वारे अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले, ‘‘पहलगाम येथील घटनेवरून सर्वसामान्यांच्या मनात चीड आहे. सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत. अबू आझमी यांच्यासारख्या मुसलमानांच्या नेत्यांनी औरंगजेबासारख्या जिहाद्यांचे उदात्तीकरण केले त्याचाच परिणाम सर्व मुसलमानांना भोगावा लागत आहे. त्यांनी जे पेरले ते आता उगवत आहेत. अबू आझमी यांच्या सारख्या मुसलमान नेत्यांच्या कर्माची ही फळे आहेत.’’

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्म विचारून गोळ्या घालायला आतंकवाद्यांना वेळ कुठे असणार ? आतंकवादाला धर्म नसतो, या वक्तव्याविषयी पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले, ‘‘यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनीच ‘भगवा आतंकवाद’ असा आरोप केला होता. त्या काँग्रेसचे नेते आतंकवादाला रंग नसतो हे कोणत्या तोंडाने बोलत आहेत. आतंकवादाचा रंग हिरवा आहे आणि काँग्रेसचा रंगही हिरवा आहे. काँग्रेसच्या नेत्यांची भाषा ही पाकिस्तानप्रेमींची भाषा आहे. आतंकवादी आणि काँग्रेस यांचा ‘डीएनआय’ एकच आहे.’’

हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास शिकवायला हवा

‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमातील मुघलांचा अभ्यासक्रम हटवला जात असल्याविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, ‘‘मुघलांचा इतिहास पुसून टाकणे ही चांगली गोष्ट आहे. आपल्या युवकांना मुघलांचा नाही, तर भारतीय संस्कृतीवर आधारित इतिहास शिकवायला हवा. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास शिकवायला हवा, असे नितेश राणे म्हणाले.