मुंबई, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील केळी व्यापारी सुरेश त्र्यंबक नाईक यांनी एक अनोखे पाऊल उचलले. देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त व्हावा, या हेतूने त्यांनी पंतप्रधान मदतनिधीत १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश जमा केला आहे.
आपण अजून किती दिवस सहन करणार ? असा सवाल त्यांनी केला. दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी माझा अतिशय मनापासून दिलेला खारिचा वाटा. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सुरेश नाईक यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका साध्या व्यापाऱ्याने जर देशाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले आहेत, तर आपण का नाही? सोशल मिडिया वर ह्या कृतीला भरगोस प्रतिसाद मिळत आहे. सुरेश यांच्या या कृतीमुळे इतर नागरीकांना देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे.