कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा होणार सुरू

    27-Apr-2025
Total Views |

kailash mansarovar yatra
 
नवी दिल्ली ( Kailash Mansarovar Yatra ): “कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. ही यात्रा उत्तराखंडच्या लिपुलेख आणि सिक्कीमच्या नाथू ला पास येथून जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान सुरू केली जाईल,” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
 
यासाठीचे अर्ज सुरू झाले असून http://kmy.gov.in या वेबसाईटवर यात्रेकरू नोंदणी करू शकतात. यानंतर यात्रेकरूंची निवड ही संगणकीकृत पद्धतीने केली जाणार आहे. प्रत्येकी 50 यात्रेकरूंच्या पाच तुकड्या लिपुलेखमधून आणि प्रत्येकी 50 यात्रेकरूंच्या दहा तुकड्या या नाथू ला पासमधून जातील.