इराण मध्ये स्फोट की घातपात?

    27-Apr-2025
Total Views |

इराण मध्ये स्फोट की घातपात?
 
 
२६ एप्रिल शनिवार रोजी इराणच्या राजाई बंदरावर भीषण स्फोट झाला, त्यामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वर्तवले जात आहे. हा स्फोट नक्की अपघात होता की नियोजीत घातपात? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. माहितीनुसार ह्या बंदरावर क्षेपणास्त्र विरोधी स्फोटके तयार करण्यासाठी रासायनिक घटक आणले जात होते. तेव्हाच अचानक मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली.
 
अमेरिकेने इराणला काही दीवसांपूर्वी धमकी दीली होती. म्हणून इराण आपली ताकद वाढवत होता. काही तज्ञांच्या मते याच कारणास्तव राजाई बंदरावर घातपात घडवून आणला असावा अशी शक्यता आहे. स्फोटाचे नेमके कारण काय? याचा शोध व चौकशी उच्च स्तरावर अजून चालू आहे.
 
इराणी अधिकाऱ्यांनी ह्या स्फोटाला ‘अपघात’ म्हणून जाहिर केल आहे. इराणचे संकट व्यवस्थापन अधिकारी हुसेन झाफरी ह्यांनी हा ‘निव्वळ कंटेनरमध्ये रसायनांचा चुकीच्या पद्धतीने साठा केल्याचा परिणाम आहे’ असे वक्तव्य केले. बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बंदरावर अग्निशामन दल तातडीने काम करत आहे. जगभरातील विविध लोकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.