पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही नंदनवनात विदेशी पर्यटकांचा ओढा कायम
27-Apr-2025
Total Views |
मुंबई, २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमध्ये स्थित पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला असून एकूण २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही पर्यटक त्यांचा दौरा सोडून त्यांच्या देशात परतले. पण काही पर्यटक असे आहेत ज्यांना काश्मीरचे सौंदर्य एक्सप्लोर करायचे आहे म्हणून ते काश्मीरला भेट देत आहेत आणि काश्मीरच्या सौंदर्याबद्दल त्यांचे मत मांडत आहेत. असे चित्र [X] च्या माध्यमातून समजले.
क्रोएशियाची एक पर्यटक म्हणाले की “आम्ही इथे ३ ते ४ दिवसांपासून आहोत आणि आम्हाला खूप सुरक्षित वाटत आहे. तुमचा देश खूप सुरक्षित आहे. तुमचा देश खूप सुंदर आहे आणि आम्हाला कोणतीही समस्या आलेली नाही. आम्ही इथे १० दिवस राहणार आहोत. काश्मीर खूप सुंदर आहे. इथली लोक खूप दयाळू आहेत आणि सर्व काही खूप वेगळं आहे, आम्ही १३ जणांचा गट आहोत. २ जण सरबियाचे आहेत आणि बाकीचे आम्ही क्रोएशियाचे आहोत. काश्मीरमध्ये पोहोचण्याच्या एक दिवस आधी या घटनेबद्दल ऐकले. दहशतवादी हल्ला हे भयानक आहे, आणि हे संपूर्ण जगात थांबेल असे वाटते.”