जम्मू काश्मीर पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्या नंतर आज खोऱ्यात पुन्हा हिंसाचार झाला. कूपवाड्या जिल्ह्यात एका दहशतवाद्यांनी घरात घूसून सामान्य नागरिकाची हत्या केली. मिळालेल्या माहितीनूसार मृत व्यक्तीचा दहशतवादी संघटनेशी थेट काहीही संबध नाही पण त्याचा भाऊ काही वर्षापूर्वी पाकिस्तानात गेला होता. तेथे तो लश्कर-ए-तोयबा मध्ये सामिल झाला होता.
या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे. संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे आणि घरोघरी तपास सुरू आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तपास यंत्रणा कसून चौकशी करत असून, दोषींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.