‘माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा’

    27-Apr-2025
Total Views |


‘माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा’

लखनऊ :पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण घटनेत कानपूरचे शुभमही मृत्युमुखी पडले. शुभमच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी शुभमची पत्नी आशान्य हिने भावनिक मागणी केली.

"सर्वात आधी माझ्या पतीवर गोळ्या झाडण्यात आल्या," असे तिने सांगितले. शुभमने हिंदू असल्याचा अभिमानाने उल्लेख केला होता. त्यानंतर त्याने प्राणांचे बलिदान दिले.

त्याच्या धैर्यपूर्ण कृत्यामुळे आशान्य हिने सरकारकडे एक विशेष मागणी केली. "माझ्या पतीला शहीदचा दर्जा द्यावा," अशी तिची जोरदार मागणी होती. गावकऱ्यांनीही आशान्यच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

शुभमच्या कुटुंबियांचे अश्रूंना आवर बसत नव्हता. गावात सर्वत्र शोकसागर उसळला होता. अनेकांनी शुभमच्या बलिदानाचे कौतुक केले.सरकारकडून योग्य ती दखल घेतली जावी, अशी स्थानिकांचीही अपेक्षा आहे.दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात शुभमने दाखवलेले शौर्य सर्वांसमोर आदर्श ठरत आहे.आता सर्वांची नजर सरकारच्या निर्णयाकडे लागली आहे.