एमएमआरडीएकडून आर्थिक वाढीसाठी नवे मापदंड

एमएमएमओसीएलच्या नॉन-फेअर रेव्हेन्यूत तिप्पट वाढ परवडणाऱ्या मेट्रो व्यवस्थेला मिळाले पाठबळ

    26-Apr-2025
Total Views | 11

एमएमआरडीएकडून आर्थिक वाढीसाठी नवे मापदंड

मुंबई, सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये म्हणजेच प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न तिप्पट म्हणजेच जवळपास १२२ कोटींची भरघोस वाढ नोंदवली आहे.
 
गेल्या वर्षीच्या ४२.५ कोटी या उत्पन्नात यंदा थेट १८७ टक्के वाढ झाली आहे. या विक्रमी वाढीमुळे एमएमआरडीएने स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवाशांना सुलभ सेवा देणारी मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. एमएमआरडीएचा एकूण ऑपरेशनल रेव्हेन्यू (क्रियात्मक उत्पन्न) १९० कोटींवरून वाढून थेट २९२ कोटींवर पोहोचला. म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ठरवलेले २०० कोटींचे लक्ष्य मोठ्या फरकाने ओलांडण्यात आले आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, *"एक उत्तम प्रकारे आखलेल्या नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यू धोरणामुळे महसूलातील हे उल्लेखनीय लक्ष्य साध्य करणे शक्य झाले. या धोरणाला राज्य सरकारचाही भक्कम पाठिंबा लाभला. मेट्रोचे भाडे लोकांसाठी परवडणारे ठेवूनही आम्ही ₹२०० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य पार करून ₹२९२ कोटींचे उत्पन्न साध्य केले."
एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल म्हणाल्या, "आर्थिक शाश्वतता आणि धोरणात्मक नियोजनावर सातत्याने भर दिल्यामुळे या वर्षी आम्हाला नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यूमध्ये तिप्पट वाढ साध्य करता आली. टेलिकॉम मत्तांचे मॉनिटायझेशन, रिटेलमधील संधी, ब्रँडिंगचे अधिकार इत्यादींच्या माध्यमातून, कोणत्याही आव्हानावर मात करत कार्यक्षमतेने सुरू राहू शकणाऱ्या आणि उच्च कार्यक्षमतेने व कमी खर्चात नागरिकांना सेवा प्रदान करू शकणाऱ्या मेट्रो व्यवस्थेची पायाभरणी करत आहोत."

नॉन-फेअर रेव्हेन्यू चे मुख्य घटक
• ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) परवाना शुल्क – ₹६१.७२ कोटी
• स्थानकांवरील जाहिराती – ₹२३.९५ कोटी
• गाड्यांवरील (आतील आणि बाहेरील) जाहिराती – ₹७.४७ कोटी
• खाजगी रिटेल आऊटलेट्स आणि किऑस्क – ₹८.२२ कोटी
• स्थानक नामकरण व ब्रँडिंग अधिकार – ₹९.७६ कोटी
• कर्मचाऱ्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन – ₹५.४३ कोटी
• टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर उत्पन्न – ₹४.५२ कोटी
• इतर उत्पन्न (चित्रीकरणाची परवानगी, स्मॉल सेल, प्रमोशन्स) – ₹०.६५ कोटी

"एमएमआरडीएच्या उल्लेखनीय आर्थिक कामगिरीतून महाराष्ट्राला कार्यक्षम, सर्वसमावेशक आणि शाश्वत शहर वाहतुकीचा आदर्श बनवण्याचे आमचे उद्दिष्ट अधोरेखित होते. नवकल्पनांवर आधारित मॉनिटायझेशन (उत्पन्ननिर्मिती) आणि कार्यक्षम संचालनाच्या माध्यमातून आम्ही जागतिक दर्जाची आणि प्रवाशांना प्राधान्य देणारी मेट्रो व्यवस्था विकसित करत आहोत."
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
"नॉन-फेअर रेव्हेन्यूमधील तिप्पट वाढ हे आर्थिक यश तर आहेच, त्याचप्रमाणे सातत्याने प्रगती करणारी, आधुनिक मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या आमच्या व्हिजनचे द्योतक आहे. मुंबईकरांसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आणि शहरी जीवनमानाचा दर्जा वाढविण्याच्या एमएमआरडीएची दृढ बांधिलकी यातून दिसून येते."
-एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121