पुन्हा ना ‘पाक’ कुरापती!

    26-Apr-2025
Total Views |

 

पुन्हा ना ‘पाक’ कुरापती!

लंडन :पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांनी लंडनमधील पाकिस्तान दूतावासा बाहेर जोरदार निषेध केला. भारतीयांनी हातात पोस्टर्स आणि झेंडे घेतले होते. त्यांनी पाकिस्तान विरुध्द घोषणाबाजी केली.

तेव्हा पाकिस्तानी दूतावासा मधील मंत्र्याने अभिनंदन चा चहा पितानाचा फोटो दाखवला. त्याच फोटोचा गळा कापण्याचा इशारा केला. ह्या कृतीमुळे भारतीय संतापले. अताशेने याच ठिकाणी "काश्मीर पाकिस्तानचा आहे" असे लिहिलेले पोस्टरही लावले.

अताशे हा पाकिस्तानच्या कार्यालयात संरक्षण अधिकारी म्हणून काम करतो. त्याच्या या वर्तनावर भारतीयांनी सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या अताशेला तातडीने काढून टाकायची मागणी केली आहे.

भारतीय समुदायाने शांततेने निषेध केला. त्यांनी पहलगाम हल्ल्याविषयी आपली नाराजी व्यक्त करत पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

हा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय सरकारकडूनही या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू आहे