नाशिकमधील २१ वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू

    26-Apr-2025
Total Views |
 
नाशिकमधील २१ वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू
नाशिक: नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यात वनरवाडी गावात बुधवार दी.२३ एप्रिलच्या सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पायल चव्हाण २१ वर्षीय युवती शेतात गवत कापयचे काम करत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. कुणालाही काही समजायच्या आत बिबट्याने पायलला जवळपास 6 ते 7 फूट फरफटत नेले.
 
आरडाओरडीचा आवाज ऐकून तिचे वडील आणि शेतकरी धावून आले. त्यांच्या ओरडण्याने बिबट्या घाबरून पायलला तिथेच सोडून जंगलात पसार झाला. पायल गंभीर जखमी झाली होती. तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारा चालू करण्या आधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
ही घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. पायल ही घरातील कर्तबगार मुलगी होती, तिच्या जाण्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
घटनेनंतर वनविभागाने परिसरात शोधमोहिम सुरू केली असून बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. जंगला जवळ असलेल्या गावांमध्ये अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून संरक्षणाची मागणी केली आहे.
 
<iframe width="914" height="514" src="https://www.youtube.com/embed/ioCxfvmRcyM" title="Leopard satellite collaring | Sanjay Gandhi national park | MUMBAI | बिबट्यांना 'सॅटेलाईट काॅलर'" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>