७०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टी प्रकल्पाच्या निविदेत MEIL ची बाजी
25-Apr-2025
Total Views |
मुंबई - ( MEIL wins 700 megawat nuclear reactor project ) NPCIL ने कर्नाटकमधील कैगा येथे दोन ७०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्ट्या उभारण्याचे काम (कैगा युनिट्स ५ आणि ६) MEIL या भारतीय खाजगी कंपनीला दिले आहे. हे एकूण ₹ १२,८०० कोटींचे काम आहे.
आतापर्यंत NPCIL कडून दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे आणि MEIL साठी अणुऊर्जा क्षेत्रातले हे एक मोठे पाऊल आहे. ऑर्डर NPCIL च्या मुंबई मुख्यालयात औपचारिकपणे MEIL चे संचालक (प्रकल्प) श्री सीएच पी सुब्बैया आणि त्यांच्या टीमला कडे सुपुर्द करण्यात आली.
पहिल्यांदाच NPCIL ने गुणवत्ता-सह-किंमत-आधारित निवड प्रक्रिया वापरली. या प्रक्रियेत MEIL ने मोठ्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांना मागे टाकले. या प्रसंगी MEIL ने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा व कामामध्ये गुणवत्ता, सुरक्षिततेच्या सर्व आंतराष्ट्रीय मानकांचे पालन करून काम करायचा विश्वास व्यक्त केला आहे. अणुउर्जेचा हा प्रकल्प भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या योजनेनुसार ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यास मदत करेल.