‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशभरातील तमाम हिंदूंना भाजपने केवळ निवडणुकीपुरता दिलेला प्रचारकी नारा नव्हता, तर तो हिंदू एकतेचा कानमंत्र होता. पहलगाममध्ये जाती, पंथ, भाषा, प्रादेशिक ओळख विचारुन नव्हे, तर धर्म विचारुन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्यानंतर ‘बटेंगे तो कटेंगे’ या सत्यवचनाची दाहकता अधिक प्रकर्षाने हिंदूंना जाणवायलाच हवी!
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे 26 हिंदू पर्यटकांचे रक्त सांडले, त्यावरून असे दिसते की, त्यासाठीचे वातावरण आधीच जाणूनबुजून किंवा नकळत तयार केले जात होते. सर्वांत मोठी चिंताजनक बाब म्हणजे, हे सर्व दुसरे-तिसरे कोणी नसून काश्मीरमधील दोन्ही प्रमुख पक्षांच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून केले जात होते. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरच्या मतदारांनी अभूतपूर्व योगदान देऊन त्यांचे सुरक्षित भविष्य निश्चित केले, हे जगाने पाहिले. पण, तरीही दोन्ही पक्षांच्या काही राजकारण्यांनी त्यांच्या जुन्या जखमा पुन्हा भरून काढण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असेच म्हणावे लागेल. कारण, आपण ज्या नेत्यांबद्दल बोलत आहोत, तेदेखील काश्मीरमधील वाढत्या पर्यटनाबद्दल एकाचवेळी नकारात्मक वातावरण निर्माण करत होते. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनीदेखील त्या पर्यटकांना लक्ष्य केले आहे, ज्यामुळे आज काश्मीर पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत आहे.
श्रीनगरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा रुहुल्लाह मेहदी आणि पुलवामा येथील पीडीपी आमदार वाहीद पर्रा यांच्या त्या चिथावणीखोर विधानांवर चर्चा करणे आवश्यक आहे. ज्यांना कुठेतरी, काश्मीरमध्ये आज निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी किमान नैतिकदृष्ट्या जबाबदार मानले जाऊ शकते. उदाहरणार्थ, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार रुहुल्लाह मेहदी यांनी एका मुलाखतीत केंद्रशासित प्रदेशात स्थानिक नसलेल्या पर्यटकांच्या गर्दीवर आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते, “सध्या जे पर्यटन सुरू आहे, मी त्याला ‘पर्यटन’ म्हणणार नाही. माझ्या मते, ते एक सांस्कृतिक आक्रमण आहे, जाणूनबुजून आणि नियोजित.” काश्मीरच्या अर्थव्यवस्थेत भरभराट आणणारा उद्योग यासारख्या नेत्यांना पचवणे कठीण होत चालले होते. त्याचे मूळ कोठेतरी इस्लामच्या विचारसरणीत आहे.
एवढेच नाही तर एका स्थानिक माध्यमास दिलेल्या मुलाखतीत श्रीनगरचे खासदार म्हणाले होते की, “1953 मध्ये काँग्रेसने, केंद्रानेही असेच काही केले होते. आमची स्वायत्तता काढून घेतली गेली आणि आमचे दिवंगत पंतप्रधान शेख अब्दुल्ला साहेबांना तुरुंगात टाकले गेले. त्यानंतर 40 वर्षे काश्मीरमध्येही असेच वातावरण होते. सर्वांचे मत होते की, काश्मीर प्रश्न सुटला आहे. काहीही नाही, पण काय झाले? काश्मीरच्या लोकांमध्ये राग होता. तो 40 वर्षांनी बाहेर आला (लाखो काश्मिरी पंडितांना त्यांच्याच घरातून बाहेर काढण्यात आले). म्हणून, 2019 साली आपण जे केले ते कायमचे आहे का, याची मला काळजी वाटते. 40 वर्षांनी ते ज्या प्रकारे वाईट स्वरूपात बाहेर आले, ते पुन्हा कधी बाहेर येईल हे मला माहीत नाही. कारण, मला माहिती आहे, मी त्या समाजातून आलो आहे.” यावर, प्रश्नकर्त्याने त्याला थांबवले आणि विचारले की तो धमकी देत होता की तो त्याचा इशारा होता? यावर ते म्हणाले, “ही धमकी नाहीये, मी देशाचा एक सहानुभूतीशील नागरिक म्हणून हे सांगत आहे.”
दरम्यान, पीडीपी नेते आणि पुलवामाचे आमदार वाहीद पर्रा यांनी एका मुलाखतीत काश्मीरमधील कथित लोकसंख्या बदलाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत 83 हजार, 742 हून अधिक काश्मिरी नसलेल्यांना अधिवास प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. पर्रा यांच्या मते, हा प्रदेशाची ओळख बदलण्याचा आणि स्थानिक लोकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मते, ‘कलम 370 आणि 35अ’ (2019 साली) हटवल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना लोकसंख्या बदलाची (लोकसंख्याशास्त्रीय बदलाची) भीती वाटते. त्यांना वाटते की, त्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्या नकळत बाहेरून लोक जोडले जात आहेत. हे आपल्याबद्दल आहे, आपल्या जमिनीबद्दल आहे. तथापि, पर्रा आणि मेहदी दोघांनीही पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि दहशतवादाविरुद्ध ते एकत्र असल्याचा दावा केला आहे.
पण, प्रश्न असा पडतो की, या नेत्यांना कधी त्यांच्या विधानांचा आणि त्यांच्या विचारांचा, विशेषतः येथील तरुणांवर होणार्या परिणामांची काळजी झाली आहे का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. पहलगाम हल्ल्यात चार ते पाच दहशतवादी सहभागी असल्याची माहिती आहे आणि त्यापैकी दोन स्थानिक असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या हातातले बाहुले होण्यापूर्वी त्या कट्टरपंथींनी क्षणभरही विचार केला नाही की, यामुळे काश्मीरमध्येच अस्थिरता निर्माण होईल, हा विचारही त्यांच्या मनात येण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, अद्याप कोठेतरी काश्मिरी मुस्लिमांच्या मनात वेगळेपणाची भावना रूजली आहे, असे म्हणावे लागते.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी हिंदूंना वेचून ठार मारले. हल्ल्यात बळी गेलेल्यांचे नातेवाईक आणि अन्य प्रत्यक्षदर्शींनी त्याची खातरजमा केली. दहशतवाद्यांनी हिंदू नागरिकांना प्रामुख्याने पुरुषांना त्यांचे धर्म विचारले. धर्म विचारण्यासाठी त्यांनी या नागरिकांना कलमा पढण्यास सांगितले आणि ज्यांना कलम पढणे जमले नाही, त्यांना इस्लामी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्याचप्रमाणे जीव वाचविण्यासाठी ज्या नागरिकांनी आपण मुस्लीम असल्याचे सांगितले, त्यांच्या विजारी उतरवून खतना झाला आहे की नाही; हे तपासले आणि त्यानंतर गोळ्या झाडल्या. यामध्ये केवळ हिंदूच नव्हे, तर एका ख्रिश्चन पर्यटकाचाही जीव इस्लामी दहशतवाद्यांनी घेतला. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला म्हणजे ‘मुस्लीम व्हा, अन्यथा मरा’ या जिहादी तत्त्वानुसारच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्थात, या दहशतवादी हल्ल्यास ‘कव्हर फायर’ देण्यासही प्रारंभ झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांतच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी मेणबत्ती मार्च काढण्यात आल्याचे दिसले. मात्र, या मेणबत्त्या हाती घेणार्या लोकांचे चेहरे पाहिल्यास त्यांना या दहशतवादी हल्ल्याचे वाईट वाटले आहे; असे काही दिसले नाही. अनेकांच्या चेहर्यावर एक विशिष्ट प्रकारची मग्रुरीही दिसून आली. या हल्ल्यानंतर स्थानिकांपैकी अनेकांनी पर्यटन व्यवसायावर होणारा परिणाम याविषयी भीती व्यक्त केली. मात्र, एका चित्रफितीमध्ये तर अशी चिंता व्यक्त करताना संबंधित व्यक्तीच्या आसपासचे त्याचे सहकारी हे हसत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या जिहादी आणि जिहाद समर्थक विचारांशी लढण्यासाठी भारत सरकार सक्षम आहे आणि सरकार आपल्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करत आहेच. मात्र, बिगरमुस्लिमांना, त्यातही प्रामुख्याने हिंदूंना सज्ज व्हावे लागणार आहे. त्यासाठी अनेक कटू निर्णयही हिंदू समाजाला घ्यावे लागणार आहेत. अर्थात, हिंदू समाज हा मूळचा सहिष्णू असल्याने असे कटू निर्णय घेणे नक्कीच जड जाईल आणि कदाचित हिंदू समाजातीलच काही घटक त्यास विरोध करू शकतात. मात्र, ‘मुस्लीम व्हा अथवा मरा’ या विचारांचा सामना सहिष्णू वृत्तीने करता येणे शक्य नाही. त्यासाठीच योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश लक्षात ठेवणे आवश्यक आहे.