पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द! पुढच्या तीन दिवसांत भारत सोडण्याचे आदेश

    24-Apr-2025
Total Views | 14
 
Visa
 
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून पुढील तीन दिवसात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
 
केंद्र सरकारने गुरुवार, २४ एप्रिल रोजी पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले असून येत्या २७ एप्रिलपर्यंत त्यांना भारत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मेडिकल व्हिसाची मुदत २९ एप्रिलपर्यंत वैध ठेवण्यात आली आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर देश सोडून जावे लागणार आहे.
 
 हे वाचलंत का? - दहशतवाद्यांसमोर अजाण म्हटली, कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या...! कौस्तुभ गणबोटेंच्या नातेवाईकांनी सांगितली आपबिती
 
पहलगाम येथे झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवार, २३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
 
१. १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित.
२. अटारी एकात्मित तात्काळ प्रभावाने बंद. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने ओलांडले आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
३ पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही एसपीईएस व्हिसा रद्द मानले जातील. त्याअंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत.
४. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत.
५. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन उद्या शनिवार १० मे, २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आ. आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती आ. प्रविण दरेकर यांनी दिली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121