कानपुर : ( Shubham Dwivedi Eyewitnesses experience ) ''दहशतवाद्यांनी माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीची हत्या केली, योगीजी... आम्हाला याचा कठोर बदला हवा आहे’' पहलगाम येथील खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभम द्विवेदी यांच्या हत्येनंतर कानपूरला पोहोचलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे शुभमची पत्नी ऐश्वर्याने न्यायाची मागणी केली.
यावेळी शुभमच्या पत्नीचे सांत्वन करताना मुख्यमंत्री म्हणाले की 'पहलगाममधील या क्रूर आणि भ्याड हल्याचा केवळ संपूर्ण देशानेच नव्हे तर जगभरातील प्रत्येक सुसंस्कृत समाजाने निषेध केला आहे' या दहशतवादी हल्याचा योग्य बदला घेतला जाईल.
*पतीच्या शर्टला पकडून पत्नी रडत राहिली, अंत्ययात्रेदरम्यान उडाला गोंधळ*
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी यांचा शेवटचा प्रवास देवरी घाटाकडे सुरू होताच त्यांची पत्नी ऐश्वर्या यांना भावना अनावर झाल्या. तिने तिच्या पतीचा तोच शर्ट २ दिवसांपासून घातला होता. अंत्ययाञेदरम्यान तिने तो शर्ट आपल्या हातात घेतला.
यावेळी अंत्ययात्रेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा डोळ्यात अश्रू होते. शुभमच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला आहे.
माझ्यासमोर विचारण्यात आले - तू हिंदू आहेस की मुस्लिम?- प्रत्यक्षदर्शी ऐश्वर्याने सांगितला अनुभव
शुभमची पत्नी ऐश्वर्याने मुख्यमंत्री योगी यांच्याकडे तिचे दुःख सांगितले आणि म्हणाली, "शुभम आणि मी घोडेस्वारी करत होतो, आम्ही मॅगी खाणार होतो. तेवढ्यात दोन दहशतवादी आले. त्यांनी विचारले- 'तू हिंदू आहेस की मुस्लिम?'" शुभम म्हणाला- 'हिंदू.' त्याच क्षणी त्यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली.
मी म्हणाले की मलाही मारून टाका तर त्यावर दहशतवादी म्हणाले 'तू जाऊन मोदींना सांग की त्याला कसे मारले.' अश्रू ढाळत ऐश्वर्या म्हणाली "योगीजी, आम्हाला याचा कठोर बदला घ्यायचा आहे, माझ्या पतीला माझ्यासमोर मारण्यात आले. आम्हाला न्याय हवा आहे."
“हा हल्ला शेवटचा खिळा ” – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभमच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, "हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण भारताविरुद्ध कट आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले शुभम द्विवेदी या क्रूर हल्ल्याचा बळी ठरले आहेत. आता हा शवपेटीवर शेवटचा खिळा ठरेल." मुख्यमंत्री पुढे म्हणाले,
"या हल्ल्याचे उत्तर संपूर्ण देशाला मिळेल. दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. या कटात सहभागी असलेल्यांना शिक्षा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाला विश्वास असला पाहिजे की प्रत्येक बलिदानाचा हिशेब दिला जाईल.