दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाखांचे बक्षिस जाहीर!
24-Apr-2025
Total Views | 19
श्रीनगर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश सध्या हादरला आहे. दरम्यान, या हल्लेखोरांना पकडण्यासाठी आता २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.
मंगळवार, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून या हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या अनुषंगाने पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना २० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.