पाकिस्तान जिंदाबाद’ बोलणार्यांना थारा देऊ नका : राजेश शिरवडकर
24-Apr-2025
Total Views | 4
मुंबई (BJP Mumbai South Central ): “दहशतवाद्यांना मदत करणारे हात भारतातमध्ये आहेत. तेच भारत क्रिकेट हरल्यावर किंवा पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यावर फटाके वाजवत असतात. मात्र, आता हे पाकिस्तानप्रेम चालणार नाही. पहलगाममध्ये भारतीयांना हिंदू असल्याने ठार मारले. दहशतवादी आपल्या दारात आहेत, तेव्हा घरात घुसतील, याचा नेम नाही. त्यामुळे एकसंघ राहा. पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणार्यांना थारा देऊ नका,” असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सांगितले.
पहलगाम येथे भ्याड अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली आणि हल्ल्याच्या निषेधार्थ दादर पूर्व येथे भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मुंबई महामंत्री आ. सुनील राणे, आ. संजय उपाध्याय, आ. कॅप्टन तमिल सेल्वन, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, ‘सिद्धीविनायक मंदिर न्यास’चे कोशाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
राजेश शिरवडकर पुढे म्हणाले की, “पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा देणार्यांना थारा देऊ नका. त्यांच्याकडून खरेदी टाळा. इथेच कमावलेला पैसा दहशतवाद्यांना पुरवला जातो. त्यामुळे दहशतवादी फोफावले आहेत. मतांसाठी काँग्रेस लांगूलचालन करीत आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्लांनी निषेध करण्याचे नाटक करू नये. काश्मीर हा भारताचा मुकुटमणी आहे, अब्दुल्लांनी तो आपल्या मालकीचा समजू नये,” असेही त्यांनी ठणकावले. तसेच, “आता मुंबई दिसते, तितकी शांत नाही. परिसरात अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘एक रहोगे तो सेफ रहोगे; बटेंगे तो कटेंगे,” असेही ते म्हणाले. तसेच, “दहशतवाद्यांना धर्म नसतो, तर दहशतवादी मुसलमानच कसे असतात?” असा प्रश्न करतानाच हिंदुस्थान हा हिंदूंचाच होता आणि हिंदूंचाच राहील,” असेही राजेश शिरवडकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी, जिल्हा महामंत्री निरज उभारे, विलास आंबेकर, मुंबई सचिव जितेंद्र राऊत, माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर, नेहल शहा, आशा मराठे, महादेव शिवगण यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.