माझ्या वडिलांना कलमा पठण करण्यास सांगितले आणि...., लेकीने सांगितला पहलगाममधील घटनाक्रम

    23-Apr-2025
Total Views |

Pahalgam
 
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam) २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए आता त्या स्केचची सर्व टीआरएफ आतंकवाद्यांच्या रेखाचित्राशी मिळतीजुळती आहे.
 
पर्यटकांवर निवडक गोळीबार करण्यात आल्यानंतर दहशतवादी जवळच्या डोंगराळ जंगलात लपून बसले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून सघन शोधमोहिम राबवली जात आहे. त्याचप्रमाणे, दहशतवाद्यांनी नेमकी कशी घुसखोरी केली याची माहिती समोर आली आहे.या दहशतवाद्यांनी सुमारे दोन आठवड्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. ते राजौरी आणि वाधवनमार्गे पहलगामला पोहोचले होते.
 
 
यावेळी गोळीबार केल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील एका व्यवसायिकाच्या मुलीने दावा केला की, दहशतवाद्यांनी इतर पर्यटकांपैकी हिंदू असणार्‍यांना लक्ष्य केले आणि गोळीबार करत ठार मारले. गोळीबार करणाऱ्या स्थानिकांनी पोलिसांची वर्दी परिधान केली होती. तेव्हा वाटले की, कदाचित दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू आहे.
हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांचा गट प्रथमत: नजीकच्या तंबूकडे आला आणि त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर संबंधित युवतीने सांगितले की, तंबूतून वडिलांना बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर युवती म्हणाली की, दहशतवाद्यांनी म्हटले की, चौधरी, तू बाहेर ये. त्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी त्याच्या वडि‍लांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर ती युवती म्हणाली की, मग त्यांनी माझ्या वडिलांना कलमा पठण करण्यास सांगितले.