"अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानची मस्ती..."; पहलगाम हल्ल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    23-Apr-2025
Total Views |
 
Eknath Shinde
 
मुंबई : असल्या भ्याड कुरापती करणारे अतिरेकी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तानची मस्ती उतरवली जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधीली पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड गोळीबार केला. त्यात २७ पर्यटकांचे प्राण गेले. या क्षणाला माझ्या मनात संताप, दु:ख, वेदना आहेत. निरपराध पर्यटकांचे हकनाक रक्त तिथे सांडलंय. असल्या भ्याड कुरापती करणारे अतिरेकी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांची मस्ती उतरवली जाईल."
 
हे वाचलंत का? -  धक्कादायक! पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू
 
हे हिजडेपणाचं लक्षण!
 
"नि:शस्त्र पर्यटकांवर हल्ले करण्यात फुशारकी मारणं हे हिजडेपणाचं लक्षण आहे. हा खेळ पाकड्यांनी सुरु केला असला तरी त्याचा दि एण्ड भारतीय जवान समर्थपणे करतील. कारण नवा भारत हा घुसके मारेंगे असं सांगून आरपार घुसवणारा आहे, हे त्यांना लवकरच कळेल. मी या हल्ल्याचा कडाडून धिक्कार करतो. हा अतिरेक्यांचा डाव कधीही सफल होणार नाही. मी मृत पर्यटकांना श्रध्दांजली वाहतो. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. त्यांच्या आप्तांना राज्य सरकारतर्फे सर्वतोपरि सहाय्य केले जाईल," असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.