२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदाच्या पत्नीची थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
22-Apr-2025
Total Views |
मुंबई : २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”