पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार अमृत भारत एक्प्रेसला हिरवा झेंडा
22-Apr-2025
Total Views |
मुंबईत दाखल होणार पहिली अमृत भारत एक्सप्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार अमृत भारत एक्प्रेसला हिरवा झेंडा
मुंबई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड ट्रेनला आधुनिक भारतीय रेल्वेची त्रिवेणी म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील वंदे भारत आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात सहरसा-लोकमान्य टिळक दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे.
नमो भारत रॅपिड ट्रेन नेमक्या कशा आहेत?
ही एक इंटरसिटी ट्रेन आहे, जी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. जी एका राज्यातील दोन शहरांना जोडते. या ट्रेनने मेट्रो शहरात जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होतील. नमो भारत पूर्णपणे वातानुकूलित आहे आणि त्यात एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या सीट्स आहेत. टाइप-सी आणि टाइप-ए चार्जिंग सॉकेट्स आणि उभे प्रवाशांसाठी खास हँडल यामुळे ते अत्यंत सोयीस्कर बनते. ट्रेनमध्ये व्हॅक्यूम-आधारित मॉड्यूलर टॉयलेट, दिव्यांगांसाठी विशेष टॉयलेट आणि धूळ-प्रतिरोधक देखील आहेत. या ट्रेनचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ती 'कवच' सुरक्षा प्रणालीने सुसज्ज आहे. त्यामुळे अपघाताचा धोका शून्य होतो. प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आग शोधणे, दमन यंत्रणा आणि आपत्कालीन टॉक-बॅक प्रणाली सुरक्षित प्रवासाची हमी देते. या ट्रेनमध्ये रूट-मॅप इंडिकेटर देखील आहेत, जे प्रत्येक स्टेशनची माहिती देतील.
अमृत भारत एक्सप्रेस नेमक्या कशा आहेत?
सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत धावणारी अमृत भारत एक्सप्रेस ही देशातील तिसरी अमृत भारत एक्सप्रेस आहे. पहिल्या दोन अमृत भारतीय एक्सप्रेस गाड्या दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल आणि मालदा टाउन ते एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू दरम्यान चालवल्या जात आहेत. ही अमृत भारत एक्सप्रेस ताशी १३० किलोमीटर वेगाने धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. मेड इन इंडिया मोहिमेअंतर्गत ही आधुनिक ट्रेन चेन्नईतील श्रीपेरांबूर येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. या नॉन एसी एक्सप्रेसमध्ये वंदे भारत सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचे सर्व कोच स्लीपर आणि नॉन एसी अनरिझर्व क्लासचे असतील. या ट्रेनमध्ये विमानाच्या धर्तीवर फोल्डेबल स्नॅक्स टेबल, मोबाईल होल्डर, फोल्डेबल बॉटल होल्डर, रेडियम एलिमिटेड फ्लोअरिंग स्ट्रिप आणि स्प्रिंग बॉडी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होईल.
या ट्रेनच्या शौचालयांमध्ये इलेक्ट्रो न्यूमॅटिक फ्लशिंग सिस्टम बसवण्यात आली आहे, ज्यामुळे शौचालये स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि पाण्याचा वापरही कमी होईल. साबण डिस्पेंसर आणि एरोसोल आधारित अग्निशमन यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रवाशां आणि ट्रेन व्यवस्थापक यांच्यात द्वि-मार्गी संवाद साधण्यासाठी आपत्कालीन टॉकबॅक सिस्टम असते. भारतीय रेल्वेच्या नॉन-एसी कोचमध्ये प्रथमच आग शोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे.