मलकापुरात सश्याची शिकार; आरोपींना अटक

    21-Apr-2025
Total Views |
indian hare poached


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मलकापूर वनपरिक्षेत्रामधून शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली (indian hare poached). त्यांच्याकडून दोन मृत ससे आणि तारेचे फास ताब्यात घेण्यात आले (indian hare poached). शिकाऱ्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. (indian hare poached)
 
 
मलकापूर वनपरिक्षेत्रामधील मौजे कोतोली येथे काही इसम शिकारीसाठी गेल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. यावेळी त्यांना दोन इसम जंगलातून येताना आढळले. वनकर्मचाऱ्यांनी या दोघांची तपासणी केली असता, त्यांच्याजवळ दोन मृत ससे सापडले. तसेच तारेचे २३६ फासे, बॅटरी, जेवणाचा डबा, १ मोबाईल फोन आढळला. सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी सुरेश आगलावे आणि वसंत शिराळकर यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना १९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावली. या प्रकरणात इतरही आरोपी सामील असून वन विभाग त्यांचा शोध घेत आहे. महत्त्वाचे म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या वनपरिक्षेत्रामध्ये शिकारी ही घटना घडली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम, वनपाल पांडुरंग चव्हाण, वनरक्षक ऋषिकेश झांजुर्णे, विठ्ठल खराडे, अक्षय चौगुले, गुरुबच्चन हिप्परकर यांनी केली.