परळी वैजनाथ येथे बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल!

    21-Apr-2025
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
बीड : बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी परळी वैजनाथ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
 
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी परळी वैजनाथ आणि गेवराई येथील तहसीलदार तसेच पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, नायब तहसीलदार आणि तहसीलदार कार्यालयाने बेकायदेशीररित्या दिलेले परळी वैजनाथ येथील १ हजार ३८९ तर गेवराई येथील १ हजार २०७ जन्म प्रमाणपत्र रद्द केले. परळी येथे आलेल्या १ हजार ३८९ अर्जांपैकी केवळ ११ अर्ज फेटाळण्यात आले होते.
 
हे वाचलंत का? -  ...म्हणून घेतला बदलाचा निर्णय! संग्राम थोपटेंनी सांगितलं पक्ष सोडण्यामागचं कारण
 
दरम्यान, आता खोटे प्रमाणपत्र दाखवून फसवणूक केल्याबदल परळी वैजनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या १८६०, कलम ४२०, ४६८, ४७१ आणि जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अधिनियम २४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली.
 
 
 
 
जरुर वाचा