झारखंडच्या करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षांची हत्या! जंगलात झाडाला लटकलेला मृतदेह आढळला
21-Apr-2025
Total Views | 10
रांची :झारखंडमधील करणी सेनाचे अध्यक्ष विनय सिंह (Vinay Singh Murder) यांची जमशेदपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह हा एनएच ३३ महामार्गावरील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलपासून ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या एका शेतातील झाडाला लटकवण्यात आला होता. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याचे सांगण्यात येत आहे.
याच निषेधार्थ विनय सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित एनएच ३३ जाम करत निदर्शने केली आहेत. ही माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र,कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच हल्ला करत प्रतिकार केला. संबंधित प्रकरण पाहता, डीएसपी बचनदेव कुजूर उलीडीह ठाण्याचे प्रमुख अभिषेक, मानगो ठाण्याचे प्रमुख निरंजन कुमार आणि सिदगोडा ठाण्याचे प्रभारी गुलाम रब्बानी मोक्यावर घटनास्थळी दाखल झाले होते.
झारखंड के जमशेदपुर में करणी सेना के राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सिंह की गोली मारकर हत्या!
यावेळी घटनास्थळी जमाव जमल्याने पोलिसांनी संबंधित जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतेवेळी कार्यकर्त्यांनी शव घेऊन जाण्यास विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले आणि शव आपल्या ताब्यात घेतले आणि नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. माशुक मनीष नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती अनेक दिवसांपासून विनय सिंह यांच्यावर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशीरापर्यंत संतप्त कार्यकर्त्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करत महामार्ग रोखून ठेवला होता. या प्रकरणात मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, हा झालेला गोळीबार आणि करण्यात आलेली हत्या ही पूर्वनियोजित असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.