आदिवासी बांधवांनो जागे व्हा; झारखंडमधील धर्मांतरण थांबवा अन्यथा अस्तित्व धोक्यात येईल!

    21-Apr-2025
Total Views | 19

conversions
 
रांची (conversions) : आदिवासी बांधवांनो जागे व्हा! मी आदिवासी बांधवांना जागृत करण्यासाठी चाकुलियाहून आलो आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत झारखंडमध्ये धर्मांतर थांबवावे लागेल, अन्यथा येथील परिस्थिती मुर्शिदाबादसारखी व्हायला फार वेळ लागणार नाही. जर धर्मांतर करणे थांबवले नाही तर आदिवासींचे अस्तित्व धोक्यात येईल असे, राज्याचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी रविवारी चाकुलियातील आदिवासी महासंमेलनात संबोधित करताना त्यांनी सांगितले आहे.
 
भारत जकात परगणा महाल आणि आदिवासी संवत सुसार आघाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील टाऊन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात चंपाई सोरेन म्हणाले की, झारखंडमध्ये फक्त नावापुरते अबुआ सरकार आहे. रांची, लोहरगृदगा, गुमला, साहिबगंज, पाकूर येथे सर्वत्र धर्मांतर वेगाने होत आहे. यावर सरकार मौन बाळगून आहे. आदिवासींची असलेली परंपरा मांझी परागणा महाल व्यवस्था संपुष्टात येत आहे.
 
१९६७ मध्ये, काँग्रेस पक्षाचे खासदार कार्तिक ओरांव यांनी आदिवासी परंपरा जतन करण्यासाठी यादीतून वगळण्याची मागणी संसदेत सर्वप्रथम करण्यात आली. पण तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने याकडे लक्ष दिले नव्हते. काँग्रेसने आदिवासींचा विश्वासघात केला आहे. आज पुन्हा सत्तेत भागीदार आहे. त्यामुळे सरकार आदिवासींचा विकास कधी करू शकले नाही.
 
संथाळ परागणातील परिस्थिती अशी आहे की मुखिला आणि जिल्हा परिषद आदिवासी महिला असून त्यांचे पती हे मुस्लिम आहेत. हे जर असेच धर्म परिवर्तन सुरू राहिल्यास आदिवासी मुलींना आरक्षण देणे बंद करावे लागेल.
 
याचपार्श्वभूमीवर आता लवकरच लाखोंच्या संख्येने आदिवासी एकवटतील आणि मोठे आंदोलन छेडतील. पुढे चंपाई म्हणाले की, आदिवासींचा इतिहास संघर्षांमय आहे. मांझीपासून ते कान्हू, चांद भैरव, बिरसा मुंडा यांच्यापर्यंत सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे. धर्मांतरणावर हल्ला केला जात असल्याचे आपल्यालाही या मैदानात येऊन हल्ला करत लढा द्यावा.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121