रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रानंतर वक्फ बोर्ड सर्वात श्रीमंत कसं झालं?

02 Apr 2025 15:51:58
 
waqf board properties in india
 
 
Waqf Board Properties : वक्फ कायद्याच्या नियमांनुसार, एकदा जमीन वक्फमध्ये गेली की ती परत करता येत नाही. भारतातील वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक मालमत्ता असून वक्फ बोर्डाला भारतात जेवढे अधिकार आहेत, तेवढे जगातील इतर कोणत्याही देशात नाहीत. वक्फ बोर्डाच्या कामकाजात गैरव्यवस्थापन, लाचखोरी आणि मालमत्तेची नोंद नसणे यांसारख्या समस्या आहेत. वक्फ जमिनीवरील बहुतांश मालमत्तेची कागदपत्रे नाहीत, त्यामुळे अनधिकृत रहिवाशांची अनेक प्रकरणे उद्भवतात.
 
वफ्फकडे एकूण किती जमीन?
 
भारतीय रेल्वेकडे एकूण ३३ लाख एकर जमीन तर भारतीय सैन्याकडे १७ लाख एकर जमीन आहे. यानंतर वक्फ बोर्ड हे देशातील सर्वाधिक मालमत्ता असणारे तिसरे मालक आहे. वक्फ बोर्डाकडे एकूण ९.४ लाख एकर जमीन असल्याची माहिती आहे. अंदाजे जवळपास १.२ लाख कोटी रुपयांची ही मालमत्ता आङे २००९ पर्यंत वक्फ बोर्डाकडे ४ लाख एकराची जमीन होती. जी अवघ्या काही वर्षांमध्ये ही या जमिनीत दुपटीने वाढ झाली आहे. याची प्रमुख कारणे वक्फ कायद्यातील त्रुटी आणि गैरवापर ही आहेत.
 
वक्फ कायद्याचा गैरवापर
 
काही राज्य वक्फ मंडळांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, ज्यामुळे समुदायात तणाव निर्माण झाला आहे.वक्फ कायद्याच्या कलम ४० च्या अंतर्गत खाजगी मालमत्तेला वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला आहे, ज्यामुळे कायदेशीर विवाद आणि अशांतता निर्माण झाली. ३० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ ८ राज्यांनी डेटा दिला होता, जेथे कलम ४० अंतर्गत ५१५ मालमत्ता वक्फ म्हणून घोषित केल्या गेल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0