डॉ. विशाल कडणे यांच्या नेतृत्वात रामनवमी निमित्त शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा

02 Apr 2025 14:31:33

vishal

 
 
मुंबई : रामनवमीचे औचित्य साधून ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, मुंबई शहरांतील शालेय शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी खास प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक बंधू – भगिनींना त्यांचे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून माहितीचे आदान – प्रदान व्हावे असा या स्पर्धेमागचा हेतू आहे.
 
ही प्रश्नमंजुषा स्पर्धा श्रीराम नवमी या संकल्पनेवरच आधारित आहे. या संकल्पनेवर ३० एमसीक्यू म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकांवरील स्पर्धकांना पारितोषिकाने गौरवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्ट कडून एक गुगल फॉर्म लिंक तयार केली असून त्या लिंकवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ५ एप्रिल दुपारी ४ वाजे पर्यंत माहिती भरावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 
ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून असे अभिनव उपक्रम राबवले जातात, याही वर्षी रामनवमीचे निमित्त साधत शिक्षकांसाठी खास स्पर्धा आयोजित केली आहे. तेव्हा जास्तीत जास्त शिक्षक बंधू – भगिनींनी सहभाग घ्यावा असे आवाहन करतो अशी प्रतिक्रिया ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विशाल कडणे यांनी दिली आहे.
 
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करावे.
 
Powered By Sangraha 9.0