मुंबई : या आठवड्यात चॅटजिपीटी ने कोट्यवधी नवीन वापरकर्ते जोडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे याच्या नवीन इमेज जनरेटरबद्दल निर्माण झालेली उत्सुकता आणि घीबली -स्टाईल इमेज ट्रेंडचा व्हायरल होणारा प्रभाव. मात्र, या ट्रेंडसोबतच काही तज्ज्ञांनी डेटा गोपनीयतेविषयी चिंता व्यक्त केली आहे, कारण अनेक वैयक्तिक आणि खासगी फोटो मोठ्या प्रमाणात या ए. आय प्लॅटफॉर्मवर अपलोड होत आहेत.
चॅटजिपीटी वर आपले फोटो अपलोड करणे सुरक्षित आहे का?
प्रत्येक ए.आय प्लॅटफॉर्मच्या धोरणांनुसार, स्पष्ट धोके नसले तरीही, स्वतः ए.आय हेच संवेदनशील माहिती व फोटो शेअर करण्यास सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देते. विशेष म्हणजे, ओपन ए.आय ने यावर अधिकृतपणे कोणतेही निवेदन दिलेले नाही. चॅटजीपीटी ने घीबली-स्टाईल इमेज जनरेटरच्या सुरक्षिततेबाबत बोलताना एक साधा इशारा दिला की, "कोणत्याही AI टूलवर, जोपर्यंत गोपनीयता व डेटा धोरणे स्पष्टपणे सांगितलेली नाहीत, तोपर्यंत फोटो शेअर करणे सुरक्षित नाही."
OpenAI अपलोड केलेले फोटो पुढील वापरासाठी संग्रहित करत नाही किंवा त्याचा उपयोग करत नाही, असे त्याने स्पष्ट केले. मात्र, तरीही "संवेदनशील किंवा वैयक्तिक फोटो कोणत्याही ए.आय सेवेसह शेअर न करणेच सर्वोत्तम आहे." गोपनीयतेच्या बाबतीत चॅट जीपीटी म्हणाले, "जर गोपनीयतेची चिंता असेल, तर सुरक्षित प्रतिमा प्रक्रिया करण्यासाठी ऑफलाइन टूल्स किंवा विशिष्ट अॅप्सचा विचार करावा."
ग्रोक३ काय म्हणतो? तुम्ही काळजी करावी का?
या विषयावर इलोन मस्क यांच्या ग्रोक३ नेही सावध भूमिका घेतली आहे. एक्स ए.आय चे डेटा व गोपनीयता धोरण अस्पष्ट असून, गोळा केलेला डेटा "सायबर हल्ल्यांना बळी पडू शकतो," असे ग्रोक३ ने स्पष्ट केले. याशिवाय, एक्स ए.आय चा उपग्रह असलेल्या एक्स (ट्विटर) वरील पोस्ट व इमेजेस ए.आय सुधारणेसाठी वापरण्यात येतात, जोपर्यंत तुम्ही खासगीरीत्या opt-out करत नाही.
ग्रोक3 ने असेही सांगितले की, "डेटाचा गैरवापर जाणीवपूर्वक नसेल, मात्र तरीही संवेदनशील माहिती असलेले फोटो अपलोड करणे टाळणे चांगले." त्याच्या मते, "एक्स ए.आय चे सुरक्षा उपाय चांगले असतील, मात्र फोटोमध्ये इतर व्यक्ती असतील आणि त्यांची परवानगी घेतली नसेल, तर ते धोकादायक ठरू शकते."
तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
चॅटजिपीटी आणि ग्रोक३ च्या सावधगिरीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ए.आय प्लॅटफॉर्मवर फोटो अपलोड करताना वापरकर्त्यांनी योग्य खबरदारी घ्यावी. खासकरून, गोपनीय माहिती असलेल्या प्रतिमा किंवा इतरांची परवानगी न घेतलेले फोटो शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करावा.